साबीर haka
माझ्या बाल्कनीत उभं राहिलं की समोर ही बिल्डिंग दिसते. हीचं बांधकाम सुरू आहे आणि खाली अर्थातच बांधकामाचं साहित्य वगैरे पसरलेलं.
2020 चं पाहिलं lockdown होतं तेव्हा आम्ही नुकतंच चंबू गबाळं आवरून घरी पोचलो होतो. अचानक झालेल्या lockdown मधे मध्यमं तेव्हा टाळ्या वाजवा, थाळ्या बडवा वगैरे भंपक स्टंट जनतेच्या माथी मारत होते तेव्हा दुसरीकडे हजारो मैल पायपीट करून घरी पोचण्यासाठी उन्हातान्हात अन्न पाण्याविना भटकणार्या लोकांच्या त्रोटक बातम्याही कुठेकुठे दिसायच्या. त्या अशांत दिवसांत एका मैत्रिणीने ही कविता शेअर केली होती.
क्या आपने कभी शहतूत देखा है,
जहां गिरता है, उतनी ज़मीन पर
उसके लाल रस का धब्बा पड़ जाता है.
गिरने से ज़्यादा पीड़ादायी कुछ नहीं.
मैंने कितने मज़दूरों को देखा है
इमारतों से गिरते हुए,
गिरकर शहतूत बन जाते हुए.
याखाली नाव होतं "साबीर हका". या कवितेने मला फार अस्वस्थ केलं होतं. हे इतकं सर्द लिहणारा मनुष्य कोण म्हणुन मी साबीर चं नाव घेऊन शोधायला सुरू केलं तेव्हा कळलं की हा स्वतःच बांधकाम मजूर आहे! इराणमधल्या तेहरान मध्ये हा जन्मलेला मजूर. याचा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित आहे, त्याला एकदोन पुरस्कार सुद्धा मिळाले पण करून पोट भरत नाही म्हणुन हा आजही मजुरी करतो.
कवितेचा संबंध romanticism शी जास्त जोडला जातो. कविता म्हटलं की काहीतरी तरल शांत गोडगोड किंवा अगदीच मचूळ वगैरे असतं
वयानुसार तुमचं आकलन वाढतं तसतसं कमी शब्दात जास्त परिणाम साधण्याची कवितेची हातोटी लक्षात येते. साबीर हका च्या कविता गीत चतुर्वेदी ने अनुवादित करून हिंदीत आणल्या. आणि मूळ कवितेच्या आशयाला जराही धक्का लागु न देता आणल्या हे गीत चतुर्वेदी चं कौशल्य.
या बाल्कनीत बांधकामाच्या खडखडाटात कधीकधी साबीर ची आठवण होते.
Comments
Post a Comment