Random
स्वयंपाक करणं माझ्यासाठी फार कंटाळवाणं काम आहे. आणि त्याच्या अगदी उलट ग्रोसरी शॉपिंग! त्यातल्या त्यात बाजारात जाऊन वेगवेगळ्या रंगाच्या ताज्या कोवळ्या लुसलुशीत भाज्या विकत मिळणं म्हणजे आहाहा... कॉलेज पर्यंत तर भाज्या खरेदी वगैरे करायचा कधीच संबंध आला नाही. पण नोकरीत जरा स्थिर स्थावर झाल्यावर बाहेरचं खाऊन कंटाळा आला तर स्वतःपुरतं आवडी आणि सवडीनुसार cooking व्हायचंच तेव्हा मूळ ग्रोसरी शॉपिंग या प्रकाराची सुरुवात झाली. त्यात D mart नं त्या आवडीला चार चांद लावले ते आहेच पण त्याविषयी पुन्हा कधीतरी. D Mart म्हणजे विषय खोल आहे.
आत्ताही रोजचा गरजेनुसार भाजीपाला आणणं वेगळं आणि प्रॉपर मंडई मध्ये किंवा गेलाबाजार आठवडी बाजाराच्या लांबच लांब दुकानांच्या रांगा फिरून त्यातल्या त्यात छान कोवळा फ्रेश भाजीपाला मस्तपैकी निवडून आणणं वेगळं.
आई बालपणी ( म्हणजे माझ्या बालपणी, आईच्या नव्हे!) बाजारातून भाजीपाला आणायची. तिनं एकदोन वेळा मला बाजारात नेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. बाजारभाव कळावा, व्यवहार कळावा म्हणुन पण शाळकरी वयात उन्हात अर्धा पाउण किलोमीटर बाजारात पायी चालत जाऊन तिथे गर्दीत तळलेल्या पदार्थांचे, भाज्यांचे, मिरच्या मसाल्यांचे नाना तर्हेचे संमिश्र वास घेत हातातली बॅग सांभाळत
Comments
Post a Comment