Cutting chopping वगैरे वगैरे

जवळपास 10-11 तास काम करून दमलेलं असणं एरवी वैतागवाणंच असतं. त्यात आणि स्वयंपाक म्हटलं की अजून कंटाळा. पण आज बाहेर तुफान पाऊस सुरू आहे. आणि पावसाचा आवाज ऐकत ऐकत सावकाशीनं तुमचं आवडतं One Dish Meal तयार करणं could be almost therapeutic. वय वाढताना therapeutic वाटणार्‍या गोष्टी सुद्धा बदलू लागल्या आहेत का? Don't know. It all depends on mood I guess. 
रोजचीच पण नीटनेटकी कामं करणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो. अगदी धुतलेले कपडे वाळत घालणं, कपड्यांच्या घड्या करणं, झोप झाल्यावर अंथरुण पांघरुन नीट आवरून ठेवणं, कपडे इस्त्री करणं, झाडू मारणं अशी रोजच्या जगण्यातलीच बिनमहत्त्वाची, रुटीन कामंही काही लोक फार सुंदर करतात. 
माझ्या बाबांना फळं, भाज्या यांचं फार छान chopping जमतं.  एकसारखे cuts आणी arrangement अशी की पाहून दिल खुश व्हावा. मला स्वयंपाकासाठी chopping करताना कधीकधी मनासारखी chopping जमली की त्यांची आठवण येते. त्यानं actual चवीवर किती फरक पडतो हा वादाचा मुद्दा असेल पण व्यवस्थित cutting करून, मसाले वगैरे साहित्य हाताशी तयार असलं की स्वयंपाकाचा जरा मूड येतो. एरवी रटाळ काम असलं तरी गोष्टी हाताशी रेडी असतील तर पट्कन स्वयंपाक उरकून इतर कामाकडे वळता येतं. Routine कामं करताना असे तुकड्या तुकड्यात कितीतरी लोक आठवत राहतात. थोडावेळ का होईना पण "मला तुमची आठवण आली होती" असं मी कुणालाच कधी सांगितलं नसेल. सांगायला हवं I guess. I don't know. पाऊस जास्त वाढलाय आणि Cooker गार व्हायच्या आत जेवून घ्यायला हवं आहे. 

Comments

Popular Posts