Dear Dad
डिअर डॅड ,
आठवडाभरापूर्वी जेव्हा आपण तुमच्या सेवापुर्ती समारंभापूर्वी बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होतात कि तुमच्या शिक्षक म्हणून असलेल्या कामाचा तिथे उहापोह व्हावा, त्यावर काय बरीवाईट मतं वगैरे असतील त्याविषयी साधक बाधक चर्चा व्हावी वगैरे वगैरे . बऱ्याच जणांनी तुमची समीक्षा तशी केलीसुद्धा पण मी फक्त शिक्षक म्हणून तुमची समीक्षा करू शकत नाही कारण तुमची शिक्षक म्हणून माझ्या आयुष्यात आलात त्याच्या कितीतरी वर्ष आधी तुम्ही वडील म्हणून आयुष्यात होताच. त्यामुळे इतर लोकांचं जसं तुमच्यासोबत अल्पकालीन interaction होतं /आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त interaction आपलं आहे आणि त्याचे दीर्घकालीन impressions माझ्या आयुष्यावर कायम राहतील.
शिक्षक म्हणून तुमचं पर्यावरणातल काम, समाजसेवेचं काम , शिक्षण क्षेत्रातलं काम , गायन , चित्रकला आणि एकूणच कला क्षेत्राची असलेली आवड , तुमचे शेजारच्या लोकांशी, माजी विद्यार्थ्यांशी , गावकरी लोकांशी असलेले ऋणानुबंध यावर खूप लोकांनी खूप काही बोलून झाले आहे पण पालक म्हणून तुमची समीक्षा आम्ही दोघचं करू शकतो (आणि अधून मधून आम्ही ती करत आलेलो आहोतच.)
psychology मध्ये एक वाक्य आहे . Every child deserves a parent, but not every parent deserves a child. I think you guys were one of those parents who deserves a child. (Maybe a better one, but yeah😜)
पालक म्हणुन इतर मध्यमवर्गीय घरांतून जे मुलांना वळण लावले जाते ते आम्हाला होतेच पण मला एकुणात तुमच्या पॅरेंटिंग मध्ये फार disctinctive factor वाटणारी गोष्ट म्हणजे मुलांना स्वावलंबन शिकवणे ! मध्यमवर्गीय पालक मुलांना उडायला पंख तर देतात, पण त्यांना 'मी म्हणेल तसतशा बेतानी मुलांनी आकाशात उडावं' अशी अपेक्षा असते. आणि यामुळे दीर्घकाळ याच सेफ झोन मध्ये राहिलेले मुलं 'मी स्वतः एकट्याने निर्णय घेऊन आयुष्यात काही करू शकेन' हा आत्मविश्वासच गमावून बसतात. अगदी तिशी पस्तिशीच्या अशा मुलांना आजूबाजूला पाहते तेव्हा सदोष parenting बद्द्ल वाईट वाटते. मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ देणं आणि त्यांना त्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकवण हे तुम्ही फार उत्तम केलात आणि त्याचे मला आणि अप्पू ला lifetime फायचे होत राहतील. बँकेचे फॉर्म भरणे , बिल भरणे , travellingचे प्लॅन्स आखणे, तडीस नेणे , Minimalist जगणे, गरजेच्या वस्तू स्वतःच्या डोक्याने खरेदी करणे , स्वतःचे पैसे manage करणे , ड्रायविंग करणे अशा खूप लहान मोठ्या गोष्टी आम्ही with minimal efforts करू शकलो कारण मुलांना decision घ्यायला शिकवणे कदाचित तुम्ही आमच्याही नकळत बालपणापासून शिकवत आला आहेत. आम्ही चुका केल्या , धडपडलो पण शिकलो आणि सावरून बाहेर पडलो यासाठी खरंतर तुमचंच कौतुक केलं पाहिजे . मला आठवतं मला इंजिनीरिंग फर्स्ट इयर ला ५५% आले होते तेव्हा तुम्ही फार रिऍक्ट न करता मला नापास झालीस तरी चालेल पण वर्ष तर पूर्ण कर म्हणून सांगितलं होतं . त्यापूर्वीच्या शालेय आयुष्यात कधी माझे ८०% च्या खाली मार्क बघायची सवयच नसताना तुम्ही रिजल्ट विषयी एवढं casual होऊ शकलात म्हणून कदाचित मी इंजिनीरिंग पूर्ण करून distinction सकट उत्तीर्ण झाले. अर्थात मार्कांच्या पलीकडे पण आयुष्यात बरंच काही असतं हे कळायला आम्हालाही काही वर्ष जावी लागली . मी वाचन तुमच्या मुळे शिकले. तुमच्यामुळे मला संगीताचा कान तयार झाला. मी थोडफार लिहू लागले. वेगवेगळ्या विचारसरणींशी माझी तोंड ओळख झाली. बऱ्यावाईट परिस्थितिथून जाऊनसुद्धा मी अंधश्रद्ध झाले नाही याचं श्रेय तुमच्या विज्ञाननिष्ठ विचारसरणीस जातं. मी graduation नंतर स्वतःच्या पायावर उभी राहिले स्वावलंबी झाले त्यासाठी तुम्ही मला वेळ घेऊ दिलात याबद्दल मी कृतज्ञ आहे. स्वतंत्र्य आणि स्वावलंबन या दोन गोष्टी मला फार प्रिय आहेत आणि त्या तुमच्या हाताखाली तयार होणाऱ्या सगळ्या मुलांना मिळाव्या यासाठी तुम्ही धडपडलात यासाठी तुमचं विशेष कौतुक आणि आभार !
अजून काय सांगू ? बाकी खूप काही आहे पण तूर्तास माझ्याबाजूने इतकेच. उद्या तुमचा कॅम्पस मधला शेवटचा दिवस असेल. Live it before you leave it. कर्मभूमी सोडताना वाईट वाटणे म्हणजे तुमचे तुमच्या कामावर प्रेम असण्याची पावती असते. त्यामुळे त्याची काळजी नसावी. यानंतर तुम्ही प्रकृतीकडे प्राधान्याने लक्ष द्या बाकी पुढची दिशा आपोआप सुचत जाईलच. खूप प्रेम आणि सेकंड इंनिंग साठी शुभेच्छा !
Comments
Post a Comment