Engineering चे अवशेष

घरात उरलेलं Engineering चं शेवटचं बाड. हे असले VLSI, Microcontroller, SAS सारख्या अगम्य नावाचे 5-6 ठोकळे प्रत्येक semester च्या शेवटच्या दीड महिन्यात वाचून संपवून कसेकाय बाहेर पडलो आईनस्टाईनला ठावूक! 🙏  तेव्हाच्या Technology च्या मानाने यातला निम्मा syllabus तेव्हाच outdated होता. आजच्या घडीला 90 टक्के outdated असावा. तरीही हे वाचून परीक्षा वगैरे देऊन उत्तीर्ण झाल्याचा किती कवतिक असायचे. यातला काहीच content नंतर कामात येत नसताना सुद्धा! अर्थात तुमच्या मार्कांचे आणि नंतरच्या आयुष्यातील चढ उतारांशी फारसे घेणेदेणे नसते हे कालांतराने तुमच्या लक्षात येतेच. त्यामुळे फारसे वाईट वाटून न घेता आज हे रद्दीत स्वाहा होणारे. The space is now less cluttered and I'm loving it. 🙂

Comments

Popular Posts