डियर डायरी

आयुष्यात कधी डायरी वगैरे लिहलीय का तुम्ही? मी लिहायचे. अजूनही क्वचित लिहिते. Depends on mood. मोठे लोक त्याकाळी सांगायचे दिसामाजी काही तरी लिहत जा वगैरे... त्याचे फायदे तोटे असतिल ते असतिल पण आधीच introvert, त्यात वाचन अफाट, त्यात शेअरिंग जवळपास शून्य आणि वाचनामुळे आपल्या वयाच्या पोराटोरांपेक्षा आपले विचार बरेच वेगळे असणं यामुळे "गटात न बसणारा शब्द" टाइप feeling माझ्या पाचवीला पुजलेले होते. म्हणजे जेव्हा वर्गात कोणत्यातरी हिंदी सिरियल मधल्या अमकीने टमकीचा कसा काटा काढला याच्यावर डिटेल चर्चा चालत तेव्हा माझ्या पुस्तकातला फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या जंगलात बटीस्टांच्या सैनिकांनी घेरलेला असे. मला सिरियलचं universe कळत नसे आणि वर्ग मैत्रिणींना क्यूबाचं जंगल. त्यामुळे जे वाटते ते सांगण्यापेक्षा आणि त्यातून समोरच्याच्या एलियन पाहिल्या सारख्या रिअ‍ॅक्शन्स घेण्यापेक्षा ते लिहून काढणे पर्यायाने सोपे देखील वाटत असावे. Because pages can't be judgemental. आणि गुलजार म्हणतात तसं "सुकून मिलता है दो लफ्ज़ कागज़ पर उतार कर,चीख भी लेता हूँ और आवाज भी नहीं होती..." हेही आहेच. 

काल रद्दी काढताना जुन्या बर्‍याच diaries (डायर्‍या) सापडल्या. अगदी 2006 ची पण! रद्दीत देऊन टाकू की राहू देऊ या dilemma मध्ये 2-4 पानं उघडली तर ते अजिबातच relevant वाटेना. बरं 2006 चं तसंच, 2010 चं तसंच, even कॉलेज डेज चंही तसंच. ठीके म्हणजे आठवणी वगैरे पण बरेचसे प्रसंग तसे किरकोळच होते आणि त्या-त्या वेळी फार बरंवाईट वाटलं असेल, रडूबिडू आलं असेल, अपमान जिव्हारी लागले असतिल किंवा कौतुकही झालं असेल पण आत्ता सेम तीच कथा वाचली तरी त्यातलं काही म्हणजे काहीच वाटत नाही. म्हणजे जे काय होतं / असतं ते ते सगळं तात्पुरतं असतं तर. And after reading few of it, I just felt indifferent! Of the same things that I've been through.... Of the same content that I myself have written! जे काय आहे त्याबद्दल काहीच जर वाटत नसेल तर मग उगाच ती रद्दी सांभाळून तरी काय करणार नं. और फिर मैने एक Bollywood हीरो की तरह अपने हिस्से की उस प्रॉपर्टी को जला दिया 😈😈😈. Felt quiet liberating actually! Again, the space got de-cluttered and I'm loving it 🙂

Comments

Popular Posts