लंडनचे दिवस

आयुष्यात पहिल्यांदा एकटीने प्रवास केला मी तेव्हा साधारण पाचवी सहावीत असणार. एकटीने प्रवास जमला पाहिजे म्हणुन बाबांनी आजीच्या गावी एकटीने पाठवलं होतं. फार लांब नाही. 60-70 किलोमीटर. पण 2 ठिकाणी बस बदलून जायच्या होत्या. मोबाईल इंटरनेट वगैरे नसलेला तो काळ. वाचता - बोलता येतं आणि रस्ता ओळखीचा आहे इतकंच काय ते भांडवल. घरी नीटच पोहोचले होते. कुठलंही काम एकटीने कसं करणार, मुलगी आहे, रिस्क नको म्हणून चिंता करत बसण्यापेक्षा.. ते शिकावं- करता यावं म्हणून त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले आणि त्याचा मला आयुष्यभर फायदा होईल. I'll always be grateful for that. 

 त्यानंतर घर सोडून एकटीने अनेक प्रवास झाले. तालुका सोडून, जिल्हा सोडून, राज्य सोडून. देश सोडून एकटीने हिंडायचा हा पाहिलाच प्रसंग होता. 

I've never travelled alone by trains in India. मला आपल्या देशात एकटीने ट्रेन ने फिरायची भीती वाटते. प्लॅटफॉर्म आयत्या वेळी चुकला, बदलला तर लगेज घेऊन दुसर्‍या प्लॅटफॉर्म पर्यंत धावत जाण्याचा confidence माझ्यात अजून नाही.
बरं आपल्याकडे रेल्वेच्या announcements, timing accuracy आणी safety च्या नावाने आनंदी आनंद आहे. 

 त्यामुळे underground tubes, trains आणी बसेस पकडून अनोळखी शहरात कसं फिरायचं याची चिंता होतीच पण लंडनने ती भीती एका दिवसात घालवली. लंडन सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात ट्रेन, मेट्रो आणि बसेस चं अफाट जाळं आहे. तुम्हाला Google maps व्यवस्थित वापरता येत असतिल तर कुणालाही एक शब्दाने चौकशी करण्याची गरज न पडता तुम्ही शहर फिरू शकता. मी तीन दिवस जमेल तितकं हे शहर उभं आडवं फिरले. कुणालाच काहीही विचारायची गरज न पडता!

 कुठल्याच स्टेशन वर 10 मिनिटांच्या वर मला वाट पहावी लागली नाही. ट्यूब (underground metro) स्टेशन्स जमिनीच्या आत 8-10 मजले खोल आहेत पण कुठेच गुदमरल्यासारखं होत नाही. ऑफिस टाइम मध्ये सेंट्रल आणि एलिझाबेथ लाइन ला ट्यूब मध्ये गर्दी होती पण कुठेच धक्काबुक्की नाही, ढकलाढकली नाही, suffocation नाही, कचरा नाही, स्टेशन वर खड्डे नाहीत, trains delay असल्या तर किती मिनिट delay आहे याचं पब्लिक display आहे आणि ऑफिस ला जाण्या येण्याचे तेवढे peak hours सोडले तर tube मध्ये गर्दी पण नाही.  पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या लंडनची आहे तरीही शहरात कुठेच ट्रॅफिक जाम पाहायला मिळाला नाही. शहराची connectivity and traffic management याचं  निःसंशय श्रेय गोर्‍यांच्या बुद्धीकौशल्य आणि व्यवस्थापनाला जातं. I loved London public transport system. 

परदेशातल्या एका नवख्या शहराने मला जो शहरात फिरायचा ease of access, comfort आणि acceptance दिला तो माझ्या राहत्या शहरानेही देऊ नये याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं.

Comments

Popular Posts