चहास्वप्नं

TCS मध्ये दिवसभर पूर्ण वेळ काम असायचं. पण संध्याकाळी 10-15 मिनिटं चहा साठी राखून ठेवलेली होती. जवळपास ODC चं कल्चरच होतं तसं. कितीही काम असलं तरी हक्काने कुणीतरी चहा साठी टेबल हून तुम्हाला उठवणार. तुम्ही चहा घेऊन यायचा, या कठड्याला टेकून वायफळ गप्पा मारत चहा संपवायचा आणि आपापल्या वेळे नुसार एकेक जण परत ODC मध्ये कामाला निघून जायचा. 

या कट्ट्यावर मला अधून मधून एक येडचाप स्वप्न पडत असे. 
मी चहा पितापिता हातातला मोबाईल कट्ट्यावर ठेवला आहे. कुणाचातरी धक्का लागतो आणि तो मोबाईल तिसर्‍या मजल्यावरून खाली पडतो. हे लक्षात येता बरोबर मी मोबाईल पाठोपाठ कट्ट्यावरुन उडी टाकते आणि अधांतरी असताना मला लक्षात येते की आपण डायरेक्ट तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी मारली आहे. नेक्स्ट मोमेंट् कपाळमोक्ष.

त्यांनंतर ऑफिस सुटलं. दुसर्‍या ऑफिस मध्ये Colleagues सोबत चहा घेणं झालंच नाही कधी. 

चहा, गप्पा, ते येडचाप स्वप्न... सगळं सोबतच संपलं.

Comments

Popular Posts