Adventure sport

हिंजवडी फेज 2 पासून घरापर्यंत पर्यंत peak time ला येणे हे adventure पेक्षा कमी नाही. पण आपली काही तक्रार नाहिये. 

9 तास ऑफिस करून ट्रॅफिक मधून लोक आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावरुन वेगवेगळ्या sizes अणि shape चे खड्डे चुकवत, दुसर्‍या गाडीला धक्का न लागु देता, एकमेकांच्या नातेवाईकांची आठवण काढत घरी पोहोचतात. बंधुभावाचे यापेक्षा चांगले उदाहरण कोणते असेल.

पावसाळा येतोय हे पाहून खोदून ठेवलेले रस्ते आणि चौक हे असे बंधुभाव जोपासण्यासाठी अनावश्यक आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे लोकांच्या मानेचा पाठीचा आणि हातापायांचा सर्वांगसुंदर व्यायाम होतो. आपल्या व्यायामाबद्दल आळशी देशात लोकांना असे सक्तीचे शारीरिक श्रम चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत याबाबत कोणाचे दुमत नसावे. हा मास्टर स्ट्रोक असल्याचे कुणी सांगितले तरी आपल्याला मान्य आहे. 
शिवाय ट्रॅफिक मुळे स्पीड आपोआप च कमी होतो. त्यामुळे वेगात गाडी चालवून अपघात होण्याची शक्यता कमी होते. 


सरकार दूरदर्शी आहे याबाबत माझी खात्री आहे. त्यामुळे रस्ते सुधारा वगैरे फालतू expectations आपले नाहियेत. फक्त हा हिंजवडी पासून जो घरापर्यंत जाण्याचा खेळ आहे त्याचा समावेश adventure sport मध्ये करावा एवढंच suggestion आहे. म्हणजे कसं की atleast लोकांना resume मध्ये expertise किंवा गेलाबाजार hobbies सेक्शन मध्ये हे skill add करता येईल. किमान हिंजवडी मधल्या कंपन्यांना असे skill सेट असलेल्या लोकांना नोकरीत प्राधान्य देता येईल. शिवाय थांबलेल्या ट्रॅफिक मध्ये हॉर्न वाजवत बसणार्‍या लोकांना विशेष मेडल देण्यात यावे. जोरजोरात हॉर्न वाजवला की ट्रॅफिक आपोआप move होईल हा आशावाद रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात आशेचा अंकुर फुलवतो. त्याबद्दल अशा लोकांचे आपण आभारी असले पाहिजे. 
याबाबत लवकरच एक ऑनलाईन petition file करण्याचा मी विचार करत आहे. इच्छुकांनी अनुमोदन द्यावे.

ता. क.  - मी सुखरूप आहे. फक्त बाजूने जाणार्‍या कार मुळे बाईक चा उजवा काच वाकला आहे आणि मागून येणार्‍या FZ ने माझ्या activa चा मुका घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे mudguard ला मुकामार लागला आहे. 🤭 पण आपण एकदम टुणटुणीत आहोत. काळजी नसावी.
असो. थंड घेतो. 

Comments

Popular Posts