Shopping
आपण खरेदीच्या बाबतीत sorted आहोत, impulsive shopper नाही आहोत. आवडली वस्तू की आण घरात असलं काही व्यसन आपल्याला नाही असा माझा समज होता.
मला किचन मध्ये चिनी मातीच्या, दिसायला उत्तम असणार्या वस्तू आवडतात. काचेचे bowls, Non stick भांडी, सुंदर दिसणारे Coffee mugs, चमचे इतकंच काय पण अगदी ताट वाट्या सुद्धा! It should look good. आणि संसार थाटल्यावर आपण या सगळ्या वस्तू आपल्या आवडीप्रमाणे विकत घेऊ असं ठरलंच होतं मुळी. Ghar सेट करता सुरुवातीला बर्यापैकी खर्च असतो म्हणुन ती खरेदी त्यावेळी टाळली आणि आत्ता वाटतंय की नशीब तेव्हा असलं काही फालतू चोचले करत बसलो नाही ते. किती अनावश्यक पसारा घरात जमा झाला असता. वस्तू जागा व्यापतात हे आहेच पण त्या तुमचा पैसा, ऊर्जा आणि वेळही मागतात याची आपल्याला हवी तितकी जाणीव असते का?
कपड्यांनी भरलेलं कपाट आवरायचं म्हटलं तरी तो पसारा बघूनच कधीकधी मानसिक दृष्ट्या drain व्हायला होतं. मग आजचं काम पुढे ढकलायचं.
असूदे, लागतील कधीतरी म्हणुन अशा बर्याच वस्तू घरा घरा पडलेल्या असतात. नाहीच काही तर वर्षातून दोन वेळा तरी त्यांची साफसूफ, पुसपास, maintenance करावीच लागते. आधीच व्यस्त आयुष्यात आणखी स्वतःहून नकोसे त्रास का ओढवून घ्यावे?
गरजा आणि संग्रह यातला फरक आपल्याला समजलेला आहे हा भ्रम होता असं वाटायला लागलं आहे. यावर पुन्हा काम करणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment