पेपर टाकणे

IT त आलो त्यापूर्वी "पेपर टाकणे" याचा एकच अर्थ होता. Newspaper distribution! आणि IT त येईपर्यंत घरी मराठी दैनिक येत असे. त्यामुळे पेपर टाकणे म्हणजे घरोघर जाऊन पेपर वाटण्याचे काम करणे इतकंच माहीत होतं. नवीन ऑफिस मध्ये येऊन चार पाच महिने झाले असणार तेव्हा एका कलीगनं येऊन खुसफुसत बातमी सांगितली की "अमुकतमुक एका माणसाने आज पेपर टाकले" ! मी मनातल्या मनात (नशिब 😂) गोंधळून विचार केला की एवढा चांगल्या पोस्ट वरचा माणूस आज अचानक पेपर वाटायचे काम का करत असावा.  मी कन्फ्युज्ड चेहर्‍याने कलीगला परत विचारलं- " म्हणजे?"
अगं पेपर टाकले पेपर!
हो पण म्हणजे काय?
अगं resign केलं गं.
अच्छा असंय होय... 

तेव्हा कुठे डोक्यात प्रकाश पडला की पेपर टाकणे म्हणजे राजीनामा देणे! 🤦 IT मध्ये तरी फक्त एका फॉर्मल मेल मध्ये मी अमुक अमुक दिवसापासुन कंपनी सोडतोय एवढंच सांगितलं जातं. टेचात बॉस च्या ऑफिस मध्ये जाऊन एका कागदावर आपल्या हस्ताक्षरात मसुदा लिहून स्वाक्षरी केलेला कागद बॉस च्या टेबल वर भिरकावला जात नाही. तरीही या सगळ्याला "पेपर टाकणे " हा शब्दप्रयोग कुठून सुरु झाला असेल काय माहीत.
त्यानंतर आयुष्यात KT, PPT,  HOTO, MoM, TSR असे ढिगाने IT जार्गन्स वापरात आले. पण अजूनही पेपर टाकणे हा शुद्ध देसी शब्दप्रयोग कुठे ऐकला की ही घटना आठवतेच. 

Comments

Popular Posts