गोवा - फुटकळ नोंदी

नोंदी - 1
एवढ्या सुंदर जागी जाऊन सुद्धा ऑफिसचंच काम करायचंय असा विचार करून वाईट वाटून घ्यावं?   की एवढ्या सुंदर जागी जाऊन ऑफिसचं कामसुद्धा करता येतंय असा विचार करून खुश व्हावं? 
I think I'd choose the later one. I'm optimistic about life sometimes... 



नोंदी - 2
मी गोव्याहून परत आले हे ऐकून एक कलीग उत्साहाने मला itinerary विचारू लागली. तिचा या विकेंडचा गोवा प्लॅन आहे त्यासाठी.  आम्ही "3 दिवस 3 जागी निवांत राहिलो "  यावर तिचा विश्वास बसेना. पुन्हा पुन्हा फिरून तिचा तोच प्रश्न. बताईये ना 3 दिन मे हो जायेगा गोवा कव्हर? आपका सब देख के होगया? मुझे आप लिस्ट दे दोगे?
तिला हे कोण सांगणार की ट्रिप्स आणि प्रवास म्हणजे निव्वळ हे बघ ते बघ असं tick mark करणं नाहिये. तोही एक फेज होताच. पण गेला तो. Trips are more of a leisure now. गुपचूप एका ठिकाणी बॅगा टाकणे आणि अख्खा दिवस आपल्या मूड नुसार वाया घालवणे. सिम्पल.. 
हे सगळं तिला कसं समजावून सांगायचं. मला ती अगदीच बिचारी वाटू लागली.

Comments

Popular Posts