Kumbalangi mights

 बर्‍याचदा सिनेमात तांत्रिकतेवर भर दिला तर गोष्ट सुटून जाते. गोष्ट सांगावी म्हटली तर ती तांत्रिकदृष्ट्या नीट हाताळता आली नाही की मग तिच्यातला भाव सुटून जातो आणि रटाळपणा येतो.

केरळात काही महिने राहिले असल्याने backwaters मनसोक्त भटकले आहे तरीही kumbalangi मध्ये अखंड सिनेमाभर जे backwater दिसत राहतं ते पाहत रहावंसं वाटतं.


कासव मध्ये ईरावती कर्वेनं सांगितलं होतं ना?- आपल्याला कुटुंबाची व्याख्याच बदलायला हवी आहे. कुटुंब हवंच आधाराला, पण मनाच्या नात्यांच. रक्ताच्या नात्यांनी आता कुटूंब ठरणार नाही.

ते कुटुंब असं तयार होताना पाहणं विलक्षण सुंदर आहे.


बर्‍याच वेळा आपण चित्रपटातून सतत काहीतरी संदेश देतोय आणि त्यातून आपल्या खांद्यावर जग सुधारण्याची मोठीच जबाबदारी वगैरे आहे या जाणिवेतून होत असेल कदाचित pt बर्‍याच चित्रपटांच्या ना शोकांतिका तयार होतात.

गोष्ट बाजूला राहते आणि उपदेश तेवढा ठासून भरला जातो. मग त्यावर reviews, चर्चा, वादंग वगैरे वगैरे...

Kumbalangi च्या बाबतीत एक गोष्ट आवडली ती म्हणजे की त्याने ही जगाला संदेश देण्याची जबाबदारीच सगळ्यात आधी काढून ठेवली असावी. त्याला फक्त गोष्ट सांगायची आहे. साध्या सुध्या माणसांची गोष्ट. आपल्यासारख्या खाऊन पिऊन सुखी असणार्‍या माणसांसाठी किंचित dysfunctional असणार्‍या लोकांची गोष्ट. आणि तो तितकंच करतो. अख्खा Movie संपल्यानंतर मग कळतं की त्याला किती किती गोष्टी सांगायच्या होत्या ते.

Dominance, एकटेपणा, त्यातून येणारं वैफल्य , masculinity , femininity aani ya दोघांच्या कॉम्बिनेशन madhun येणारं समंजस नातं असं खूप काही. पण या सगळ्याची लिंक नाही लागली तरीही चालणार आहे. तरीही गोष्ट आवडेल अशीच सांगितली आहे आणि अखंड चित्रपट भर दिसणारं backwater veg veglya रुपात पाहणं ही visual treat aahe.

Comments

Popular Posts