प्रतीक कुहाड

प्रतीक कुहाड हे नाव अजूनही भारतीय संगीत विश्वातलं underrated नाव आहे. मोजून तीसेक गाणी असतील. 
त्यापैकी रात राजी, cold/mess, तुने कहा, 'तुम जब पास होती हो' ही आणि अजून 4-5 गाणी मिळून माझ्या कडे प्रतीकची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे. 
एखाद्या शुक्रवारी ऑफिसमधून आल्यावर थंडगार फरशीवर अंग टाकून रात्रभर निवांत पडून रहावसं वाटतं तेव्हा प्रतीक कुहाड ची गाणी ऐकावीत. It's pure bliss. 
प्रतीक कुहाड कधीही पॉप्युलर होऊ नये तो कायम underrated राहावा असं मला मनापासून वाटतं. कारण त्याची गाणी मुळातच दहा लोकांनी मिळून मजा मस्ती करत ऐकण्याची गाणी नाहीतच. ते शांततेचा गाणं आहे. फार फार तर तुमच्या रूममेट ना तुम्ही शुभ्र चंद्रप्रकाशाततल्या रात्री गिटारवर तुमच्या आवडत्या tunes ऐकवाव्यात असं गाणं... ती गाण्याची खाजगी मैफिल आहे. It's not for everybody. आणि ते तसंच राहावं. नाहीतरी शांतता वाटून घेऊ शकणारे खूप कमी लोक असतात आयुष्यात. आणि ते कमी असतात म्हणूनच बेशकिमती असतात. प्रतीक बेशकिमती आहे आणि तो तसाच राहावा. तो जगाचा कधीही होऊ नये.

Comments

Popular Posts