Fb 1
तुम्ही गेले शहाण्णव तास एकटे असता. रस्त्यावरच्या वर्दळीचा आवाज वगळता इतर कोणताही आवाज नसलेला एकांत. असा एकटेपणा तुम्ही usually एन्जॉय करता. But not today. आज काहीतरी बिनसलंय. काय बिनसलं आहे हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. You have a story to tell. ती गोष्ट एकसारखी डोक्यात टिकटिकतेय. तुम्ही मोठ्यानी गाणी ऐका, मूवी बघा, घर आवरा की आणखी काही करा... गोष्ट constant आहे. डोक्यातल्या त्या किड्याची टकटक शेवटी असह्य होते आणि तुम्ही कागद-पेन शोधायला धावाधाव करता.
कपाटातला निम्मा पसारा उचकटल्यावर फायनली वही-पेन सापडतं. भराभर लिहायला घेता. लिहून संपतं. हायसं वाटतं. मग दोन मिनिटांनी कळतं की अजून टकटक थांबलेली नाही कारण गोष्टीला कान मिळालेले नाहीत. काय करावं याचा बराच विचार केल्यावर तुम्ही ही गोष्ट ऑनलाइन टायपिंग करायला घेता. डोक्यातल्या टकटकीसोबत कीबोर्डवर ताल धरत बोटं फिरवून झाली की गोष्ट डिजिटल रूपात अवतरते. फेसबुकच्या खिडक्या उघडतात. गोष्ट पब्लिक होते आणि तुम्ही फायनली एक खोल श्वास घेणार तेवढ्यात गोष्टीवर पहिला हाहा येतो. मग कळतं की गोष्ट सांगून होण्यापेक्षा गोष्ट समोरच्यापर्यंत न पोहोचणं जास्त वाईट आहे.
जितक्या वेगाने तुम्ही पोस्ट केली होती त्याच्या दुप्पट वेगाने तुम्ही सेटिंग्ज ओपन करता. गोष्ट "ओन्ली मी" करता. स्वतःच स्वतःला मिटून घेतल्याचा एक दीर्घ उच्छ्वास टाकता आणि अशारितीने नव्या वर्षाचा सतरावा ड्राफ्ट वॉल वरून उगाचच वेडावणार हे कळल्याबरोबर त्याचा राग येऊन तुम्ही फाटकन् लॅपटॉपची स्क्रीन बंद करता. कानात हेडफोन आणि पायात शूज चढवून दाणकन् दार आपटून सुसाट वेगाने एकटेच वॉकला निघता.
अठ्ठयाण्णवावा तास कसा वाया घालवायचा याची तजवीज करावी म्हणून...
Comments
Post a Comment