किनारा

आयुष्यात पहिल्यांदा समुद्र पाहिला तेव्हा मी आठ वर्षांची असेल. सुरतमधला दांडी येथला समुद्रकिनारा. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जिथं केला तोच. असं नजर ठरेल तिथवर पाणीच पाणी पाहून मला जाम मज्जा वाटली होती तेव्हा. तोवर फक्त समुद्र म्हणजे काय याची पुस्तकी व्याख्या तेवढी माहित होती. समुद्र काय असतो, क्षितिज कसं दिसतं, जहाज कसे दिसतात याबद्दल सहाजिकच बालसुलभ कुतूहल होतं
दोन वर्षांपूर्वी ऑफिसच्या schedule ला वैतागून एके दिवशी अचानक तिथल्या चार-पाच मित्रांना गाडीत कोंबून एका वीकेंडला अलिबागला घेऊन गेले होते. तिथे मी त्यांना हा किस्सा सांगितला होता की मी पहिल्यांदा समुद्र पाहिला तेव्हा मी किती प्रचंड खूश झाले होते ते. 
त्या दिवशी मला कळलं की या पाचही जणांनी अखंड आयुष्यात आज पहिल्यांदाच समुद्रात पाहिलाय. म्हणजे वयाच्या 26 27 व्या वर्षी!! And none of them were as happy and as excited as I was.
मग वाटलं, की समुद्राविषयी तसं आकर्षण कदाचित मला एकटीलाच असावं. कारण आजवर भारतातल्या किनारपट्टी लाभलेल्या दहापैकी सात राज्यातले वेगवेगळे अनेक समुद्रकिनारे माझे पाहून झाले आहेत पण आजही समुद्र म्हटलं कि मन आपोआपच खूश होऊन स्वतःशी गिरकी घेतं. 
स्वच्छ, शांत, तुरळक वर्दळ असणारे, समुद्राच्या आत किंवा काठाकाठाने एखादी किलोमीटरची रपेट सहज होईल असे समुद्रकिनारे मला भयंकर आवडतात. तिथं पायी भटकणं, सूर्यास्त पाहणं, वाळूवर निव्वळ पडून राहणं, लाटांचा आवाज ऐकणं, किल्ले बांधणं, शंख गोळा करणं असले काहीही उद्योग करत रात्र होताना समुद्राकाठी टाईमपास करणं हा माझा favorite उद्योग आहे. पण दुर्दैवाने असे क्षण आयुष्यात फार कमी वेळा येतात. पुण्यात समुद्र नसल्याचं फार वाईट वाटतं अशा वेळी. 😐

Comments

Popular Posts