उडते तीर

मला गुलजार आवडतात... लता मंगेशकर आवडतात आणि पुलंही आवडतात.
आयुष्यभर एकही ओळ न खरडलेले लोक गुलजारांच्या लेखणीला सुमार म्हणतात. बाथरूम singing च्या पलिकडे न गेलेले लोक लताबाईंनी तिशीनंतरच गाणं थांबवायला हवं असे फुकट सल्ले फेसबुकवर पाजळत असतात. पुलंचे विनोद काही लोकांना बालीश वाटतात. सोशल मीडियावर अशी सगळी रणधुमाळी यथेच्छ चालू असते.

या लोकांसमोर आपण एक भलंमोठ्ठं शून्य आहोत याची मला जाणीव आहे त्यामुळे कोणीतरी जेव्हा म्हणतं- "तु फार अग्रेसिव्ह आहेस" तेव्हा आपण होयबा म्हणून मान डोलवावी. 
"तुला डोक्याने मॅच्युअर व्हायला अजून दोनेक वर्षे जावी लागतील" अशी कोणी कुजकट कमेंट केली की आपण "agreed" म्हणावं. आणि याच्या अगदी विरुद्ध कुणी जेव्हा कौतुक करतं तेव्हाही फक्त स्माइल द्यावी आणि पुढच्या कामाला लागावं. 

आपले आपण एकच व्यक्ती असलो तरी वेगवेगळ्या लोकांसाठी आपलं व्यक्तीमत्व वेगवेगळं आहे हे पक्कं माहित करुन घ्यावं म्हणजे इतरांचे बरेवाईट तीर जिव्हारी न लागता पलटून लावता येतात.

Comments

Popular Posts