वर्तुळं

तुमचं आयुष्यातलं श्रेयस कसं ठरवावं यावर जपान्यांनी इकिगाई नावाचा एक कॉन्सेप्ट ठरवलाय. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय येतं आणि कोणत्या गोष्टीला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे या तीन गोष्टी एकमेकांना छेद देणार्‍या वर्तुळामध्ये जर मांडल्या तर त्यांचा सुवर्णमध्य जो आहे तो म्हणजे तुमचा जगण्याचा मुख्य हेतू होय. हा सुवर्णमध्य तुम्हाला सापडला म्हणजे आयुष्याचं श्रेयस सापडलं असं समजावं म्हणे.

आमच्या आयुष्यात श्रेयस भलतच तीन वेगळ्या वर्गांमध्ये विभागले गेलंय. म्हणजे कथा, कविता आणि कादंबरी आवडणाऱ्या, भान विसरून वाचणार्‍या आणि त्या जगात राहणाऱ्या एका पोरीच्या नशिबी इंजिनिअरिंग सारखा एक तांत्रिक आणि रटाळ अभ्यासक्रम यावा याहून दुर्दैव ते काय असेल. बालकवी, ना धों महानोर, भटसाहेब, गालीब, आणि कुसुमाग्रज यांच्या स्वप्नातील जगातून फरफटत कोणीतरी ओढून आणावं आणि डायोड, कॅथोड, नेटवर्क, कॅलकुलस आणि कसले कसले ते भयानक थेरम शिकवून आयुष्य काळवंडून टाकावं हे खतरनाक आहे. 

त्यातून सावरतो न सावरतो तोच Branches, settlements, OOPS लँग्वेजेस वगैरे वेगळ्या धाटणीचे राक्षस आयुष्यात येऊन उभे राहिले आणि मेहनतीने त्यातून सावरायला जातोच आणि तोच एक नवा विषय डोक्यात वळवळू लागला-

"अर्थशास्त्र." हा नावाप्रमाणेच भारदस्त आणि भीतीदायक  विषय समजून घ्यायची फार गरज आहे. किमान ठेवी मुदत परतावा व्याज पीएफ पीएफ कर्ज हप्ते लिक्विड आणि Non लिक्विड investments एलआयसी पॉलिसी थोडं-थोडं बेसिक जगण्याकरता ज्ञान असणे आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे. फार फार आवश्यक आहे. 

आणि अशा रीतीने पुन्हा एकदा एक नवीन विषय इच्छा नसतानाही आज ना उद्या, रडतखडत आणि हळूहळू का होईना पण शिकावा लागणार आहे. लागणारच आहे! आयुष्याच्या Venn Diagram मधलं तिसरं वर्तुळ पुन्हा एकदा गोल रेखाटून गडद होणारे. आणि याही वेळेस ते इतर दोन वर्तुळांना छेद देणार नाहीये हे जास्त वाईट आहे. 🤕



Comments

Popular Posts